Tu Chal Pudha: शिल्पी स्वतःच्याच घरात करणार चोरी? अश्विनीला त्रास देण्यासाठी रचणार नवा डाव!

0
16
Tu Chal Pudha: शिल्पी स्वतःच्याच घरात करणार चोरी? अश्विनीला त्रास देण्यासाठी रचणार नवा डाव!


Tu Chal Pudha Latest Update:तू चाल पुढं’ या मालिकेची खलनायिका अर्थात शिल्पी वाघमारे आता अश्विनीला बेघर करण्यासाठी नवे डाव खेळताना दिसत आहे. अश्विनीला स्वतःपेक्षा पुढे जाऊ द्यायचं नाही, असा विडाच शिल्पीने उचलला आहे. आता अश्विनीला काहीही करून त्रास द्यायचा असं ठरवून शिल्पी स्वतःच्याच घरात चोरी करणार आहे. मात्र, ही चोरी पैशांची नसून, घराच्या कागदपत्रांची असणार आहे. शिल्पी वाघमारेंच्या घराचे कागद चोरून, हे घर स्वतःच्या नावावर करून घेण्याचा डाव रचत आहे. अश्विनीला आणि तिच्या कुटुंबाला घराबाहेर काढणे हा एकच मनसुबा सध्या तिच्या अग्रक्रमी आहे.



Source link