
मयुरीने प्रतीकला भेटू नये यासाठी तिने तिचा मोबाईल देखील काढून घेतला होता. अश्विनीने तिला घरातच कोंडून देखील ठेवले. मात्र, यातही प्रतीक मयुरीला भेटण्याचा प्रयत्न करत होता. आपण पळून जाऊन लग्न करू असे बोलून त्याने मयुरीचं मन वळवण्याचा प्रयत्न देखील केला. मात्र, मयुरीने यासाठी स्पष्ट नकार दिला. अश्विनीने घातलेल्या अटीमुळे प्रतीक आता शहर सोडून न निघून गेला आहे. याचाच धक्का आता मयुरीला बसला आहे. मयुरी तिची आई अश्विनीवर प्रचंड संतापली असून, ती आता आईविरोधात उभी ठाकणार आहे.






