
Viral Story: रस्त्याच्या कडेला असलेल्या स्टॉल्सवर वर्तमानपत्रे, शूज, चप्पल, कपडे आणि खाद्यपदार्थ यांसारख्या वस्तू विकताना आपण नेहमीच पाहतो. परंतु, कोणाला चुंबन किंवा मिठी विकताना कधी पाहिलेत का? मात्र, चीनमध्ये काही तरुणी मिठी मारणे आणि चुंबन विकत असल्याची बातमी वाऱ्याच्या वेगाने पसरत आहे. याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. मात्र, यासंदर्भातील काही फोटो व्हायरल झाली आहेत, ज्यामुळे इंटरनेट वेगळीच चर्चा सुरू झाली.








