
व्हिडिओ पाहून असा अंदाज लावता येऊ शकतो की, व्हिडिओमध्ये दिसणारा तरुण आणि तरुणीचे नुकतेच लग्न झाले आहे. याआधीही तरुणाने अनेक व्हिडिओ आणि रील बनवून सोशल मीडियावर शेअर केले आहेत. मात्र, आता त्याने चक्क आपल्या हनीमूनचा व्हिडिओ शेअर केलाय. हा व्हिडिओ पहिल्यानंतर एका युजरने म्हटले आहे की, हे व्लॉगर्स पूर्णपणे वेडे झाले आहेत. महत्त्वाचे म्हणजे, हा व्हिडिओ नेमका कुठचा आहे, हे स्पष्ट झालेले नाही.परंतु, व्हिडिओमध्ये जोडपे हिंदी भाषेत एकमेकांशी बोलताना दिसत आहेत.







