Train Accident : प्रवासी ट्रेन आणि मालगाडीची टक्कर; भीषण अपघातात 6 जणांचा मृत्यू, अनेक जखमी

0
13
Train Accident : प्रवासी ट्रेन आणि मालगाडीची टक्कर; भीषण अपघातात 6 जणांचा मृत्यू, अनेक जखमी


Bilaspur Train Accident : छत्तीसगडच्या बिलासपूर जिल्ह्यात एक मोठा रेल्वे अपघात झालाय. हावडा मार्गावर धावणारी कोरबा पॅसेंजर ट्रेन लालखदानजवळ एका मालगाडीला समोरासमोर धडकली. हा अपघात इतका भीषण होता की अनेक डबे रुळावरून घसरले आहेत. ज्यामुळे घटनास्थळी मोठी गर्दी पाहिला मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला असून हा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तर 12 जण जखमी झाले आहेत.

Add Zee News as a Preferred Source

माहिती मिळताच, रेल्वे आणि जिल्हा प्रशासनाचे पथक तातडीने अपघातस्थळी पोहोचले असून बचावकार्य सुरू आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात येत आहेत. रेल्वे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आहेत आणि मदतकार्य सुरू केले आहे. अपघातानंतर बिलासपूर-कटनी मार्गावरील रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत आणि त्या मार्गावरून वळवण्यात आल्या आहेत. 

हा अपघात बिलासपूर-कटनी रेल्वे मार्गावर घडला आहे, जो सर्वात वर्दळीचा मार्ग आहे. हा अपघात का घडला यामागील कारण अद्याप समोर आलेलं नाही. चौकशीनंतरच या अपघाताचे खरे कारण स्पष्ट होईल. अपघातात ओव्हरहेड वायर आणि सिग्नल सिस्टीमचेही नुकसान झाले आहे, ज्यामुळे ट्रॅक पुनर्संचयित करण्यास विलंब होऊ शकतो. हा परिसर अतिशय वर्दळीचा रेल्वे मार्ग मानला जातो, त्यामुळे दुरुस्तीचे काम जलद गतीने केले जात आहे. एवढी मोठी निष्काळजीपणा कशी घडली हे शोधण्यासाठी रेल्वेने चौकशी सुरू केली आहे. दरम्यान AI च्या माध्यमातून हा अपघात कसा झाला असेल या व्हिडीओत दाखवण्यात आला आहे. 

रेल्वेकडून मिळालेल्या माहितीनुसार, मेमू ट्रेनच्या दोन डब्यांची एका मालगाडीशी टक्कर झाली. बिलासपूर स्टेशनजवळ दुपारी 4 वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. 





Source link