फलटणच्या आंबेडकरी चळवळीतील  घनश्यामभाऊ काकडे यांना भावपूर्ण आदरांजली

0
7
फलटणच्या आंबेडकरी चळवळीतील  घनश्यामभाऊ काकडे यांना भावपूर्ण आदरांजली


फलटण :-  फलटणच्या आंबेडकरी चळवळीत मोलाचे योगदान देणारे, सनी काकडे यांचे वडील घनश्यामभाऊ काकडे यांचे निधन झाल्याने सामाजिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे. भाऊंनी आपल्या कर्तृत्वाने समाजाला एक लढवय्या पॅंथर दिला, जो सनी काकडे यांच्या रूपाने आंबेडकरी चळवळीत खंबीरपणे उभा राहिला आहे.

घनश्यामभाऊंच्या जीवनात प्रत्येकाला दिलेला आधार हा समाजासाठी एक उर्जास्थान होता. त्यांच्या पाठीवरील शाबासकीची थाप हीच अनेकांसाठी सर्वोच्च सन्मान होती. त्यांच्या रुपाबदार व्यक्तिमत्त्वाने प्रत्येकाच्या छातीत अभिमान निर्माण केला. असा प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाचा पिता समाजाने जगभर मिरवावा अशी भावना त्यांचे मित्रपरिवार आवर्जून मांडत असतात.

भाऊंनी आयुष्यात कधीही द्वेषभावना बाळगली नाही. त्यांच्या शिकवणीचे संस्कार समाजाला अभिमानास्पद ठरले आहेत. त्यांच्या जाण्याने आंबेडकरी चळवळ एक आधारस्तंभ गमावला आहे.

साहस टाईम्सच्या वतीने विनम्र अभिवादन🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻