
असित मोदी पुढे म्हणाले की. ‘सध्या परिस्थितीची अशी निर्माण झाली आहे की, आम्ही दयाबेनचे पात्र मालिकेत परत आणू शकत नाही आहोत. मात्र, याचा अर्थ नाही की, दयाबेन कधीच परत येणार नाही. या पात्रासाठी आता दिशा वाकाणीच येईल की, आणखी कुणी.. हे येणारी वेळच सांगेल. पण, ‘तारक मेहता का उल्टा चष्मा बंद होणार नाही, आणि दयाबेन मालिकेत परतून येईलच, हे माझं प्रेक्षकांना वचन आहे. कोणतीही लीप न घेता ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका गेली १५ वर्ष प्रेक्षकांचे अविरत मनोरंजन करत आहे.








