
स्मृती इराणी म्हणाल्या की, टीएमसीचे गुंड प्रत्येक रात्री महिलांचे अपहरण करतात व त्यांच्यावर बलात्कार करतात. संदेशखली येथील महिलांनी माध्यमांसमोर आपल्या व्यथा मांडल्या आहेत. त्यांनी सांगितले की, तृणमूलचे गुंड घरोघरी जाऊन कोणती महिला वयाने लहान आहे, कोणती महिला सुंदर आहे, ते बघतात तिचे अपहरण करतात. त्या महिलांना अनेक दिवस डांबून ठेवतात, त्यांच्यावर अत्याचार करतात. तसेच हे गुंड प्रामुख्याने हिंदू महिलांवर अत्याचार करत असल्याचा आरोपही इराणी यांनी केला आहे.







