
आज लोकसभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी तीन नवीन विधेयक सादर केली. यामध्ये नवीन फौजदारी कायद्याच्या विधेयकामुळे देशातील गुन्हेगारी न्याय व्यवस्थेत सुधारणा होणार आहे. ज्यातून दंड, शिक्षा ऐवजी ‘न्याय’ या तत्त्वावर लक्ष केंद्रीत केले जाणार आहे.
Three Criminal Amendment Acts Passes : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज लोकसभेत तीन विधेयक सादर केले. बॉलीवूड चित्रपटातील एका लोकप्रिय ओळीचा संदर्भ देताना ते म्हणाले की, ‘तारीख पे तारीख’ हा गुन्हेगारी न्याय व्यवस्थेचा निषेध करीत आता यावर सुधारणा करण्याची गरज आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज लोकसभेत भारतीय न्याय संहिता (द्वितीय सुधारणा) (एनबीएस-२०२३), भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (द्वितीय सुधारणा) (बीएनएसएस-२०२३) व भारतीय साक्ष (द्वितीय सुधारणा) (बीएस-२०२३) अशी तीन विधेयके सादर केली. या तीनही विधेयकांना यापूर्वीही सादर केले गेले होते. मात्र, खासदारांनी त्यात अनेक बदल सुचविल्यामुळे या कायद्यांना संशोधनासाठी संसदीय समितीकडे पाठविण्यात आले होते.









