
आगामी लोकसभा निवडणुकीची घोषणा कोणत्याही क्षणी होऊ शकते. हीच बाब लक्षात घेऊन भाजपाने आपली तायरी चालू केली. सर्वच पक्षांनी आता जोरदारपणे तयारी केली आहे. असे असताना एका माथेफिरूने खुद्द पंतप्रधान मोदींनाच जीवे मारण्याची धमकी दिली आहे. याचा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.
Threatening to Kill PM Narendra Modi : लोकसभा निवडणुकीची सर्वच पक्षांची तयारी सुरू असताना, कर्नाटकमधील मोहम्मद रसूल कद्दारे नावाच्या एका व्यक्तीने खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच जीवे मारण्याची धमकी दिली आहे. त्याने समाजमाध्यमांवर हातात तलवार घेऊन एक व्हिडीओ शेअर केला आहे. केंद्रात काँग्रेसची सत्ता आल्यास मी मोदींना जीवे मारणार अशी धमकी त्याने या व्हिडीओच्या माध्यमातून दिली आहे. हा व्हिडीओ समाजमाध्यमांवर चांगलाच व्हायरल झाल्यानंतर कर्नाटकमधील सूरपूर पोलीस ठाण्यात या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Karnataka | An FIR has been registered against Mohammed Rasool Kaddare at Yadgiri’s Surpur police station. He shared a video on social media where he threatened to kill PM Modi if the Congress government came to power at the Centre. FIR has been registered under section…
— ANI (@ANI) March 5, 2024









