The Welfare Department of the Thane Crime Investigation Branch ३६ लाखांचा मुद्देमाल जप्त

0
7
The Welfare Department of the Thane Crime Investigation Branch ३६ लाखांचा मुद्देमाल जप्त


ठाणे : ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गेल्या काही महिन्यांपासून सोनसाखळी चोरी, वाहन चोरी, दरोडा आणि घरफोडी करणाऱ्या चार सराईत गुन्हेगारांना ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेेच्या कल्य़ाण विभागाने अटक केली आहे. त्यांच्याकडून ३६ लाख रुपयांचा चोरी केलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

वसीम युसुफ अली सय्यद उर्फ वसीम काला (३०), कौसर युसुफ अली जाफरी उर्फ बुशी (३३), शिवासिंग अमिरसिंग बावरी (२५) आणि पुनमकौर अमिरसिंग बावरी (३७) असे गुन्हेगारांची नावे आहेत. हे चौघेही कल्याणमधील रहिवाशी आहेत. या आरोपींनी ठाणे आणि नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये घडलेल्या एकूण २९ गुन्ह्यांची कबुली दिली आहे. त्यामध्ये दरोडा, सोनसाखळी चोरी, मोटार वाहन चोरी, घरफोडी या गुन्ह्यांचा समावेश आहे. या गुन्ह्यांमध्ये वापरण्यात आलेल्या आणि चोरीला गेलेल्या मालमत्तेमधून एकूण ३६ लाख २९ हजार ७२५ रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने आणि सहा चारचाकी वाहने हस्तगत करण्यात आली आहेत.

हेही वाचा





Source link