
गेल्या काही दिवसांपासून द केरळ स्टोरी चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. याबाबत निर्मात्यांना विचारताच ते म्हणाले की, ‘आता पर्यंत आम्ही चित्रपटाचे डिजिटल हक्क विकलेले नाहीत. पण चित्रपटाचे हक्क खरेदी करण्यासाठी अनेक दिग्गज कंपन्या आमच्याकडे येत आहेत. मात्र, आम्ही कोणाचीही ऑफर स्वीकारलेली नाही.’







