Tharla Tar Mag: अर्जुनला लागलीये सायलीची ओढ; ‘ठरलं तर मग’ मालिकेत येणार प्रेमाचा बहर!

0
14
Tharla Tar Mag: अर्जुनला लागलीये सायलीची ओढ; ‘ठरलं तर मग’ मालिकेत येणार प्रेमाचा बहर!


सुभेदारांच्या घरात सध्या कृष्ण जन्माष्टमीचा उत्सव सुरू आहे. मात्र, या दरम्यान घरात सायली दिसलेली नाही. घरातील वादांमुळे सायलीला घरातून थेट बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. सायली जरी सुभेदारांच्या घरापासून दूर असली, तरी मनाने मात्र ती घरातच रमली आहे. घरातील कृष्ण पूजेत कुणालाच पाळणा गाता न आल्याने अर्जुनने थेट सायलीला व्हिडीओ कॉल केला. यानंतर सायलीने व्हिडीओ कॉलवरून बाळकृष्णाचा पाळणा म्हटला. यानंतर आता मालिकेच्या विशेष भागात दहीहंडीची धूम पाहायला मिळणार आहे. या दरम्यान अर्जुन आणि सायलीमध्ये प्रेम फुलताना दिसणार आहे.



Source link