
एकीकडे अर्जुन आणि रविराज यांच्यात घरगुती वाद तर आहेच. मात्र, कोर्टात देखील ते एकमेकांच्या विरोधात उभे राहिलेले दिसले आहेत. मात्र, आता सायलीच्या बोलण्यानंतर दोघांच्याही मनातील अढी दूर होणार आहे. तर, सायलीच्या मनाचा हा चांगुलपणा पाहून अर्जुन आणखीनच तिच्या प्रेमात पडणार आहे. आता तरी, सायलीवरचं प्रेम तो मोकळेपणाने व्यक्त करू शकेल का? हे मालिकेच्या येत्या भागांमध्ये कळणार आहे.







