Tharala Tar Mag: फाईलचं नेमकं सत्य काय? पूर्णा आजीच्या रागानंतर सुभेदारांच्या घराची दारं प्रियासाठी होणार बंद?

0
25
Tharala Tar Mag: फाईलचं नेमकं सत्य काय? पूर्णा आजीच्या रागानंतर सुभेदारांच्या घराची दारं प्रियासाठी होणार बंद?


अर्जुन सायली सत्य सांगणार?

या आधीही प्रियाने सायली आणि अर्जुन यांचे लग्न मोडण्यासाठी सत्य सांगण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यावेळी ही सायलीने देवाच्या पुढे उभी राहून शपथ घेतल्यामुळे सगळ्यांनी सायलीवर विश्वास ठेवला होता. आता देखील प्रिया एक खोटी फाईल घेऊन सायली आणि अर्जुन छान नात्यावर प्रश्नचिन्ह लावतेय, हे लक्षात आलं म्हणून पूर्णा आजी प्रचंड संतापतात. त्यांनी अर्जुन-सायलीऐवजी प्रियाच्या कानाखाली मारली आणि तिला घरातून बाहेर काढलं. इतकंच नाही, तर यापुढे सुभेदारांच्या घरात पाऊल ठेवायचं नाही, अशी तंबी देखील दिली. मात्र, यानंतर आता अर्जुन आणि सायली देखील भांबावून गेले आहेत. आपल्या नात्याचं सत्य आपणच आपल्या कुटुंबाला सांगायचं, असं त्यांनी ठरवलं आहे.



Source link