
Tharala Tar Mag 21 October 2024 Serial Update : ‘ठरलं तर मग’ या मालिकेत आज प्रेक्षकांना खेळ पालटताना पाहायला मिळणार आहे. आश्रमाच्या केसमध्ये आता एक मोठा ट्वीस्ट येणार आहे. महिपत आणि साक्षी शिखरे यांनी पैसे देऊन जजला देखील विकत घेतले होते. त्यामुळे कोर्टात अनेक गोष्टी सिद्ध करून देखील जजने महिपतच्या बाजूने निर्णय देत सायली आणि मधुभाऊंचा ‘वात्सल्य आश्रम’ जमीनदोस्त करण्याचा निर्णय दिला आहे. या जमिनीचे मालक महिपत शिखरे असून, ती त्यांच्या ताब्यात देऊन पुढील काम सुरू करण्यास कोर्ट परवानगी देत असल्याचा निर्णय जजने दिला आहे. मात्र, आता अर्जुन आपली शक्कल लढवून महिपतची ही खेळी उधळून लावणार आहे.