
Tharala Tar Mag 4th January 2024 Serial Update: छोट्या पडद्यावरची लोकप्रिय मालिका ‘ठरलं तर मग’ आता अतिशय रंजक वळणावर आली आहे. या मालिकेत आता प्रेक्षकांना प्रेम फुलताना पाहायला मिळणार आहे. सायली आणि अर्जुन यांच्यात जरी दुरावा निर्माण झाला असला, तरी यामुळे त्यांच्यातील प्रेम आता वाढताना दिसणार आहे. सायलीच्या आठवणीत आता अर्जुन व्याकूळ झाला आहे. सायली घरात नसताना आता पावलोपावली त्याला सायलीची आठवण येत आहे. या दरम्यान आता अर्जुनची आई थेट सायलीला फोन करणार आहे.








