Tharala Tar Mag 2nd Dec: सायली सोडून जाणार अर्जुनचं घर? ‘ठरलं तर मग’ रंजक वळणावर!

0
16
Tharala Tar Mag 2nd Dec: सायली सोडून जाणार अर्जुनचं घर? ‘ठरलं तर मग’ रंजक वळणावर!


Tharala Tar Mag 2nd December 2024 Serial Update:ठरलं तर मग‘ या मालिकेत नुकतंच सायली आणि अर्जुन यांच्यात लुटूपुटूचं भांडण झालेलं पाहायला मिळालं आहे. मात्र, आता त्यांच्यातील हे भांडण टोकाला जाताना पाहायला मिळणार आहे. अर्जुन सायलीचा भूतकाळ शोधून काढण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, त्याने याची कल्पना न दिल्यामुळे सायली त्याच्यावर रागावली आहे. आता त्यांच्यात घरातील छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद होताना दिसणार आहेत. अर्जुन घरात पसारा करून ठेवत असल्यामुळे सायली त्याला सतत बडबड करणार आहे. मात्र, यावेळी अर्जुन उलट तिच्यावरच रागवणार आहे. घरात शांती हवी, असं म्हणून त्याने सायलीला गप्प राहण्यास सांगितलं होतं.



Source link