
नुकतीच अर्जुनने रस्त्यावर जाणाऱ्या एका व्यक्तीशी हाणामारी केली होती. आधीच वैतागलेला अर्जुन सायली खरेदीसाठी पुढे गेली असताना, रस्त्याच्या कडेलाच फोनवर काहीतरी करत उभा होता. मात्र, त्याचवेळी एका दुचाकीस्वाराचा त्याला धक्का लागला. यानंतर दुचाकीस्वार पुन्हा मागे येऊन अर्जुनला बडबड करू लागला. तुमच्यासारखी श्रीमंत बापाची बिघडलेली मुलं अशीच रस्त्याच्या कडेला उभी राहून फोनच्या नादात दुसऱ्याच नुकसान करतात, असे तो व्यक्ती म्हणू लागला. यानंतर त्या व्यक्तीने अर्जुनकडे पैशांची मागणी देखील केली. आधी शांतपणे ऐकून घेत असलेला अर्जुनचा आपल्या रागावरचा ताबा सुटतो आणि तो त्या व्यक्तीला मारू लागतो. हे पाहून आता सायली वादात उडी घेऊन दोघांना थांबवणार आहे.








