
Tharala Tar Mag 1 January 2024 Serial Update: ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या कथानकात आता मोठा ट्विस्ट येणार आहे. नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी प्रेक्षकांना या मालिकेत जबरदस्त वळण पाहायला मिळणार आहे. इतके दिवस एकमेकांशी हातचं राखून वागणारे सायली आणि अर्जुन आता पहिल्यांदाच जोरदार भांडण करताना दिसणार आहेत. सायली आणि अर्जुन आता एकमेकांशी शुल्लक कारणांवरून भांडताना दिसणार आहेत. तर, यानंतर सायली देखील अर्जुनला धमकी देणार आहे. या दोघांमधील भांडणाने आता कथानकाला नवं वळण मिळणार आहे.








