
सायली आणि अर्जुन यांनी अतिशय कठीण परिस्थिती एकमेकांशी लग्न करावे लागले होते. सायली ही अनाथ आश्रमात लहानाची मोठी झालेली एक मुलगी आहे. मात्र, तिने आपल्या आश्रमाला अगदी स्वतःचं घर बनवलं आहे. याच आश्रमातच ती लहानाची मोठी झाली होती. याच आश्रमाच्या जमिनीवर काही लोकांचा वाईट डोळा होता. यामुळे जमीन बळकावण्याचा इराद्याने या आश्रमात धक्कादायक घटना घडवण्यात आली होती. यात आश्रमातील विलास नावाच्या व्यक्तीचा खून झाला. तर, या खूनाचा आरोप मात्र मधुभाऊंवर म्हणजे आश्रम सांभाळणाऱ्या वडिलांसमान व्यक्तीवर आला. मात्र, मधुभाऊ आरोपी नाहीत याची सायलीला खात्री होती.








