Tharala Tar Mag 15th Feb: चैतन्य आणि अर्जुनच्या मैत्रीत पडणार फूट; नोकरीतूनही देणार राजीनामा!

0
17
Tharala Tar Mag 15th Feb: चैतन्य आणि अर्जुनच्या मैत्रीत पडणार फूट; नोकरीतूनही देणार राजीनामा!


चैतन्यला आपली आनंदाची बातमी सांगायला गेलेला अर्जुन आता स्वतः मात्र दुःखी होऊन घरी परतणार आहे. चैतन्यच्या वागण्यामुळे दुखावलेला अर्जुन घरी परतण्याऐवजी बाहेरच गाडीत रडत बसतो. तर, अर्जुन अजून घरी परतून कसा काय आला नाही, या विचाराने सायली अस्वस्थ झाली आहे. अर्जुन घरी यायला कधीच इतका उशीर करत नाही. तो नक्की कुठे अडकला असेल, या विचाराने सायलीचा जीव कासावीस झाला आहे. तर, सायलीची ही अवस्था बघून आता कल्पना देखील तिला काळजी न करण्याचा सल्ला देणार आहे. अर्जुन एखाद्या कामात अडकला असेल, त्यामुळे त्याला उशीर होत असेल, असे कल्पना सायलीला म्हणणार आहे. मात्र, एक वाजून गेला तरी अर्जुन परतला नाही, हे बघून आता सायली त्याला शोधण्यासाठी बाहेर येणार आहे.



Source link