
Tharala Tar Mag 15th December 2023 Serial Update: ‘ठरलं तर मग‘ मालिकेत आता सायलीच्या आयुष्यात आनंदाचे क्षण येताना दिसणार आहेत. आता मालिकेत सायलीला तिची आई आणि बाबा या दोघांचे आशीर्वाद मिळताना दिसले आहेत. त्यामुळे आता तरी तिला तिची आई-वडील एकत्र भेटतील, अशी सगळ्यांनाच आशा आहे. सायली बालपणापासूनच आपल्या आई वडिलांपासून दुरावली आहे. अनाथ म्हणून लहानाची मोठी झालेली सायली आता अर्जुनशी लग्न करून एका मोठ्या कुटुंबात नांदत आहे.






