
महिपतनीच या सगळ्या गोष्टी मुद्दाम घडवून आणल्या आहेत, हे अर्जुनला आधीच माहित होतं. त्यामुळे अर्जुन देखील तडक घरी पोहोचला. इतक्या सगळ्या गोष्टी करून आपल्याच डायनिंग टेबलवर बसून, आपल्याच घरातल्यांसोबत जेवण करत असलेला महिपत पाहून अर्जुनच्या रागाचा पारा वाढला. यामुळे अर्जुन महिपतवर आणखीनच चिडला. मात्र, हीच गोष्ट सुभेदार कुटुंबाला सहन झाली नाही. ‘जेव्हा मला अटक झाली, तेव्हा तू कुठे होतास’, असा प्रश्न अर्जुनच्या वडिलांनी अर्थात प्रताप सुभेदार यांनी अर्जुनला केला. यानंतर, अर्जुनने आपल्या औषध कंपनीत काम करत असलेल्या संतोष नामक व्यक्तीला घरी बोलावून या संदर्भात काही प्रश्न विचारले. मात्र, मी काहीही केलेलं नाही, असे म्हणत त्याने सगळ्या गोष्टी टाळल्या.







