
सायलीच्या जीवाला असलेला धोका आता टळला आहे. तिचा जीव वाचवण्यात डॉक्टरांना यश आलं आहे. मात्र, तिच्या जीवाला असलेला धोका अद्याप टळलेला नाही. तिच्यावर एकदा झालेला हल्ला पुन्हा होण्याची शक्यता आहे. कुणीतरी सायलीचा जीव घेण्याचा प्रयत्न करताय हे आता सगळ्यांच्याच लक्षात आलं आहे. त्यामुळे हॉस्पिटलमध्ये असलेल्या सायलीवर पुन्हा एकदा हल्ला होऊ शकतो, असे सगळ्यांनाच वाटत आहे. यामुळे आता सायलीकडे कुणी थांबायचं यावरून चर्चा होणार आहेत. यावेळी प्रिया सायली जवळ थांबण्याची परवानगी मागणार आहे. मात्र, सगळेच तिला नकार देणार आहेत.






