
पूर्णा आजीने आपला नातसून म्हणून आपला स्वीकार केल्यामुळे सायली मनापासून आनंदून गेली आहे. स्वतःच्या रूममध्ये जाऊन सायली घळाघळा आपल्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहत असताना, तिथं अर्जुन येतो. अर्जुनच्या येण्याने सायली क्षणाभारासाठी जागी स्तब्ध झाली. मात्र, त्या क्षणी ती अर्जुनकडे वळून त्याला म्हणणार आहे की, ‘अर्जुन सर प्लीज मला हे आनंदाचे क्षण जगू द्या. आज जो हा आनंद मला मिळाला आहे, तो काही क्षणांसाठी का होईना, पण माझ्यासाठी खरा आहे. तो खोटा असल्याचे जाणवू देऊ नका प्लीज! आज पहिल्यांदा पूर्णा आजी माझ्याशी खूप चांगलं बोलल्या आहेत. त्यांनी मला प्रेमाने जवळ घेतलं आहे. माझ्यासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे. आजवर तुमची आजी म्हणून मी म्हणून मी पूर्णा आजीकडे बघत आले आहे. तुमची आजी म्हणून मला त्यांचा नेहमीच हेवा वाटायचा. माझ्याकडे स्वतःची आजी कधीच नव्हती. पण, आजपासून माझ्याकडे देखील एक आजी असणार आहे. माझी पूर्णा आजी!’








