
Tharala Tar Mag 13 August 2024 Serial Update: ‘ठरलं तर मग’ या मालिकेत आता अतिशय रंजक वळण पाहायला मिळणार आहे. प्रतिमा आत्याच्या आठवणी परत याव्यात म्हणून आता सगळेच जोरदार प्रयत्न करताना दिसत आहेत. तर, यासाठी आता सायलीला एक भन्नाट आयडिया मिळाली आहे. पण, सायलीचे हे प्रयत्न बघून प्रिया मात्र मनातून हादरून गेली आहे. अधिक प्रतिमा प्रियाशी फटकून वागते. जर तिच्या आठवणी परत आल्या, तर ती आपल्याला घरातून काढूनच टाकेल, असं प्रियाला वाटत आहे. त्यामुळे ती चांगलीच घाबरली आहे.