Thane News : ठाण्यात मोठी दुर्घटना! फुटबॉल मैदानात पडला इमारतीचा पत्रा! सात ते आठ मुले गंभीर जखमी

0
20
Thane News : ठाण्यात मोठी दुर्घटना! फुटबॉल मैदानात पडला इमारतीचा पत्रा! सात ते आठ मुले गंभीर जखमी


या प्रकरणी घटनास्थळी असलेल्या नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार फुटबॉल टर्फवर मुले खेळत होती. यात लहान आणि मोठ्या मुलांचा देखील समावेश होता. पाऊस सुरू झाल्यामुळे लहान मुलांना घरी पाठवण्यात आले. यानंतर येथे मोठी मुलं फुटबॉल खेळत होती. दरम्यान, पावसाचा जोर वाढला. तसेच वादळी वारा देखील सुरू झाला. या वाऱ्यामुळे शेजारी असलेल्या एका मोठ्या इमारतीवरील पत्र हा मैदानावर खेळत असणाऱ्या मुलांच्या अंगावर पाडला. यात आठ मुलांना गंभीर दुखापत झाली असून यातील दोघांची प्रकृती ही गंभीर असल्याची माहिती आहे. या फुटबॉल मैदानावर मुलांना प्रशिक्षण दिले जाते. कोच या ठिकाणी मुलांना ट्रेनिंग देतात. त्यामुळे इथे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत अनेक मुले फुलबॉल खेळण्यासाठी येतात.



Source link