
Thane JN1 Covid : राज्यात कोरोनाच्या नव्या JN 1 व्हेरिएंटने टेन्शन वाढवले आहे. या नव्या व्हेरिएन्टचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळू लागले आहेत. देशासह राज्यात रुग्णसंख्या वाढतांना दिसत आहे. रविवारी पुण्यात या नव्या विषाणूने बाधित दोन रुग्ण आढळले होते. त्यानंतर आता ठाण्यात देखील पाच रुग्ण आढळले असल्याने ठाणेकरांची चिंता वाढली आहे. या वाढत्या रुग्ण संख्येमुळे आरोग्य यंत्रणा देखील अलर्ट मोडवर आल्या आहेत.


