Terrorist Attack | वायुसेनेच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा हल्ला; पाच जवान जखमी | Navarashtra (नवराष्ट्र)

0
18
Terrorist Attack  | वायुसेनेच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा हल्ला; पाच जवान जखमी | Navarashtra (नवराष्ट्र)


वायुसेनेच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा हल्ला; पाच जवान जखमी

जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यात शनिवारी हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. या भ्याड हल्ल्यात तीन अधिकाऱ्यांसह पाच जवान जखमी झाले. हल्ल्यानंतर स्थानिक राष्ट्रीय रायफल्स युनिटने परिसराला घेराव घातला व परिसरात शोधमोहीम सुरू केली.

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यात शनिवारी हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. या भ्याड हल्ल्यात तीन अधिकाऱ्यांसह पाच जवान जखमी झाले. हल्ल्यानंतर स्थानिक राष्ट्रीय रायफल्स युनिटने परिसराला घेराव घातला व परिसरात शोधमोहीम सुरू केली.

शनिवारी संध्याकाळी हवाई दलाच्या जवानांचा ताफा निघाला होता. दोन वाहनांमधून हे जवान जात होते. पुंछ जिल्ह्यातील सूरनकोटमधील सनाई गावाजवळ या ताफ्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. शाहसीतारजवळील हवाई तळाच्या आत वाहने सुरक्षित करण्यात आली आहेत, अशी माहिती सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली.






Source link