दुधेबावी येथे टेम्पोची मोटारसायकलला धडक : युवती ठार

0
9
दुधेबावी येथे टेम्पोची मोटारसायकलला धडक : युवती ठार

फलटण : फलटण तालुक्या दुधेबावी गावच्या हद्दीत फलटण ते दहिवडी रस्त्यावर गुरुवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास नियंत्रण सुटलेल्या आयशर टेम्पोने मोटारसायकलला समोरून जोरदार धडक दिल्याने मोटारसायकलवरील मुलगी ठार झाली असून एकजण गंभीर जखमी झाला आहे. अपघातानंतर टेम्पोचालक फरार झाला असून या अपघाताची फिर्याद रफिक अब्बास मुलाणी यांनी फलटण ग्रामीण पोलिसात दिली आहे. पोलिसांनी अज्ञात टेम्पोचालकावर गुन्हा दाखल केला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

या अपघाताची पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, टीव्हीएस पल्सर मोटरसायकल (क्रमांक – एम ११ सीएस ८९६८) वरून प्रवास करीत असलेले धीरज हिंदूराव सराटे व अंकिता सुभाष मगर (दोन्ही राहणार मलवडी) यांना समोरून दहिवडीकडून येणाऱ्या आयशर टेम्पो (क्रमांक एमएच १२ एआर ६३०६) वरील चालकाचे दुधीबावी गावच्या हद्दीतील एस वळणावर नियंत्रण सुटून टेम्पोने मोटारसायकलला समोरून जोरदार धडक दिली.

.या अपघातात अंकिता सुभाष मगर हिचा मृत्यू झाला तर धीरज सराटे हा गंभीर जखमी झाला आहे. अपघातानंतर टेम्पोचालक फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.