
Happy Birthday Tamannaah Bhatia: बॉलिवूडची ‘बाहुबली’ अभिनेत्री तमन्ना भाटिया हिचा आज (२१ डिसेंबर) ३४वा वाढदिवस आहे. साऊथ चित्रपटांपासून बॉलिवूडपर्यंत आपलं नाव गाजवणारी तमन्ना अतिशय ग्लॅमरस अभिनेत्री आहे. अभिनयासोबतच तमन्ना तिच्या फॅशन सेन्समुळे देखील नेहमीच चर्चेत असते. तमन्नाने अनेक हिट चित्रपट देऊन प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले आहे. मात्र, तमानांसाठी हा प्रवास तितका सोपा नव्हता. सध्या तमन्ना अभिनेता विजय वर्मासोबतच्या नात्यामुळे प्रचंड चर्चेत आहे. अभिनेता विजय वर्माच्या नव्हे, तर या आधीही अनेक प्रसिद्ध चेहऱ्यांसोबत तमन्नाचे नाव जोडले गेले आहे.







