Taiwan Earthquake | तैवानमध्ये 25 वर्षांत सर्वात शक्तिशाली भूकंप, इमारती कोसळल्या; सुमारे एक लाख घरांची वीज गेली! | Navarashtra (नवराष्ट्र)

0
21
Taiwan Earthquake  | तैवानमध्ये 25 वर्षांत सर्वात शक्तिशाली भूकंप, इमारती कोसळल्या; सुमारे एक लाख घरांची वीज गेली! | Navarashtra (नवराष्ट्र)


तैवानमध्ये 25 वर्षांत सर्वात शक्तिशाली भूकंप, इमारती कोसळल्या; सुमारे एक लाख घरांची वीज गेली!

तैवानमध्ये 25 वर्षांतील सर्वात शक्तिशाली भूकंप आला आहे. भुंकपाच्या धक्क्यामुळे अनेक इमारती कोसळल्या असून सुमारे एक लाख घरांची वीज गेल्याची माहिती आहे.

जपानमध्ये सोमवारी रात्री उशिरा भूकंपाचे धक्के (Earthquake in Japan ) जाणवले. ही बातमी ताजी असतानाच आता पुन्हा एका देशाला भूकंपाचे धक्के जाणवले. तैवानमध्ये बुधवारी सकाळी जोरदार भूकंप (Taiwan Earthquake) झाला. यूएस जिओलॉजिकल सर्व्हे (यूएसजीएस) नुसार, भूकंपाची तीव्रता 7.4 एवढी होती. भूकंपामुळे शहरातील अनेक भागात वीजपुरवठा खंडित झाला आहे. या भुंकपामुळे एकाचा मृत्यू झाला असून ५० हून अधिक जण जखमी झाले आहेत.

काल जपानमध्ये भूंकप आल्यानंतर आज तैवानमध्ये भूकंप आला. जपानच्या इवाते आणि आओमोरी प्रांतात ६.१ रिश्टर स्केलचे भूकंपाचे धक्के जाणवले. तर तैवानला 7.4 रिश्टर स्केलचे भूकंपाचे धक्के जाणवले. याची झळ फक्त तैवान बसली नसून इतर देशांनाही बसली आहे. रिपोर्टनुसार, दक्षिण जपान आणि फिलिपाइन्ससाठी सुनामीचा इशारा देण्यात आला आहे.






Source link