
Tadoba news : चंद्रपूर येथील ताडोबा व्याघ्र प्रकल्पात वाघ पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. मात्र, हे पर्यटक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा टाकत असल्याने याचा फटका येथील वन्यजीवांना बसत आहे. याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. एका वन्य जीव छायाचित्रकाराने हा व्हिडिओ काढला आहे. ताडोबा अभयारण्यातील एक वाघ पाणवठ्यात पडलेली एक प्लॅस्टिकची बॉटल तोंडात धरून ती घेऊन जात असतांनाचा हा व्हिडिओ आहे. दरम्यान, या व्हायरल व्हिडिओवरुन तरी येथे येणारे पर्यटक धडा घेणार हा प्रश्न आहे.







