
कोणताही गॉडफादर नसताना बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नूने बॉलिवूडमध्ये स्वत:चे असे वेगळे स्थान निर्माण केले आहे. तापसी तिच्या अभिनयासोबतच तिच्या बेधडक वक्तव्यासाठी चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहे. कोणतंही वक्तव्य करताना ती मागे पुढे पाहत नाही. चित्रपट असो किंवा वैयक्तिक आयुष्य ती नेहमीच खंबीरपणे तिची भूमिका मांडताना दिसली आहे. आज १ ऑगस्ट रोजी तापसी तिचा वाढदिवस साजरा करत आहे. परंतु, आपल्या एवढ्या वर्षांच्या करिअरमध्ये तिने एकाही बॉलिवूड अभिनेत्याला डेट केलं नाही. यामागील कारणही तिने स्पष्ट केलं होतं. एका अभिनेत्री आणि अभिनेत्यामधलं नातं फारसं टिकू शकत नाही, असं तिने म्हटलं होतं.






