Swati Maliwal Case | ‘स्वाती मालीवाल यांना मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी कोणी बोलावले?’, विभव कुमारांच्या वकीलाचा न्यायालयात युक्तिवाद! | Navarashtra (नवराष्ट्र)

0
21
Swati Maliwal Case | ‘स्वाती मालीवाल यांना मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी कोणी बोलावले?’, विभव कुमारांच्या वकीलाचा न्यायालयात युक्तिवाद! | Navarashtra (नवराष्ट्र)


‘स्वाती मालीवाल यांना मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी कोणी बोलावले?’, विभव कुमारांच्या वकीलाचा न्यायालयात युक्तिवाद!

राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांनी विभव कुमार यांच्यावर मारहाणीचा आरोप केला. या सुनावणीदरम्यान तीस हजारी कोर्टात सुनावणी झाली

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे खाजगी सचिव विभव कुमार यांच्या जमीन याचिकेवर सोमवारी (२७ मे) तीस हजारी न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी विभव कुमार यांचे वकील हरी हरन यांनी युक्तिवाद केला. राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांनी जबरदस्तीने मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी प्रवेश केला. त्यांचा त्रास देण्याचा हेतू होता. खासदार असल्याने त्यांना काहीही करण्याचे स्वातंत्र्य मिळत नाही, असे वकील हरी हरण म्हणाले. विभव कुमार यांच्या वतीने वरिष्ठ वकील हरिहरन यांनी बाजू मांडली. हरिहरन म्हणाले की, या प्रकरणात कोणताही पुरावा नसला तरी मुद्दाम कलमे जोडण्यात आली आहेत. तर दिल्ली पोलिसांनी जामिनाला विरोध केला. या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला आहे.

स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीवरून दिल्ली पोलिसांनी आयपीसी कलम ३०८ अंतर्गत या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. त्यावर तीस हजारी सत्र न्यायालयात सुनावणी सुरू आहे. बिभव कुमारचे वकील एन हरिहरन यांनी न्यायालयात युक्तिवाद केला की स्वाती यांना मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी भेटीची वेळ नव्हती, तरीही ती त्यांना भेटण्यासाठी सीएम हाऊसमध्ये आली होती. या वादासाठी त्यांनी मुद्दाम त्यांच्या सोयीनुसार ड्रॉईंग रूमची निवड केली होती.






Source link