
स्वराच्या एका मैत्रिणीने हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करत लिहिले की, ‘स्वराला तिच्या विदाईच्या शुभेच्छा, आपल्या सर्वांसाठी एक भावनिक आणि जबरदस्त क्षण…’ मात्र, या फोटोमध्ये स्वराचे वडील दिसत नव्हते. या व्हिडीओवर स्वराच्या वडिलांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी लिहिले की, ‘हा हृदयस्पर्शी ‘क्षण’ शेअर केल्याबद्दल धन्यवाद @sinjini_m… स्वरा भास्करच्या लग्नाचा हा सोहळा आता संपत आला आहे. होय.. या माणसाकडे फ्रेम बाहेर राहण्यासाठी चांगले कारण होते. हा खरंच प्रत्येकासाठी भावनिक क्षण आहे, अगदी ‘खडूस’ वडिलांसाठी… आमच्या लाडक्या स्वरा भास्करची बिदाई’