Swara Bhaskar: अखेर स्वरा भास्कर अडकली लग्नबंधनात, फोटो चर्चेत

0
33
Swara Bhaskar: अखेर स्वरा भास्कर अडकली लग्नबंधनात, फोटो चर्चेत


काही दिवसांपूर्वी स्वराने सोशल मीडियावर पोस्ट करत कोर्टात लग्न केल्याची माहिती दिली होती. तिच्या या निर्णयाने सर्वांनाच धक्का बसला होता. ‘अनेकदा आपल्या जवळ किंवा अगदी सोबत असलेली गोष्ट आपण दूरवर कुठंतरी शोधत असतो. आम्ही देखील अशाच शोधात होतो, प्रेमाच्या. आधी आम्हाला आमच्यातली मैत्री गवसली आणि त्यातून मग आम्ही दोघे एकमेकांना सापडलो. फहाद हा समाजवादी पक्षाच्या युवाजन सभेचा राज्याचा अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ता आहे. २०२० साली झालेल्या एका आंदोलनाच्या दरम्यान दोघांची भेट झाली होती. याच आंदोलनात दोघांनी पहिला सेल्फी एकत्र काढला होता. विशेष विवाह कायद्यांतर्गत ६ जानेवारी २०२३ रोजी आम्ही न्यायालयात विवाह नोंदणी केली आहे’ असे ट्वीट स्वराने केले होते.



Source link