Sushma Andhare : ईव्हीएम सेट केलं नाही असं तुम्ही म्हणत असाल तर…; सुषमा अंधारे यांनी भाजप समर्थकांना झोडपले!

0
16
Sushma Andhare : ईव्हीएम सेट केलं नाही असं तुम्ही म्हणत असाल तर…; सुषमा अंधारे यांनी भाजप समर्थकांना झोडपले!


Maharashtra EVM Issue : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत झाली तर महायुतीने अभूतपूर्व यश मिळवत २३५ जागांवर विजय मिळवला. महाराष्ट्राच्या निकालानंतर देशभरात ईव्हीएमचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. अनेक पक्षांनी तसेच नेत्यांनी ईव्हीएम हटवण्याची मागणी लावून धरली आहे. काँग्रेसने ईव्हीएम हटवण्यासाठी देशपातळीवर मोहीम आखली आहे. मात्र भाजपसह सत्ताधारी मित्रपक्ष विरोधकांचे आरोप फेटाळून लावत ईव्हीएमचे समर्थन करत आहेत. सोशल मीडियावरही या मुद्द्यावरून विरोधक व सत्ताधाऱ्यांमध्ये जोरदार कलगीतुरा रंगल्याचं पाहायला मिळत आहे. याच मुद्द्यावर उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी भाजप समर्थकांना सवाल करत संताप व्यक्त केला आहे.



Source link