
Sushant Singh Rajput Case: मुंबई महानगरपालिकेच्या आवारात दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतला न्या द्या, अशा आशयाचे पोस्टर लावण्यात आले आहेत. सुशांत सिंह राजपूतसोबत दिशा सालियानलाही न्याय द्या देण्याची मागणी करण्यात आली आहे. आम्ही न्यायाच्या प्रतीक्षेत आहोत, असे देखील या पोस्टरवर छापण्यात आले आहे. दरम्यान, २०२० मध्ये सुशांत सिंह राजपूतने जगाचा निरोप घेतला.







