
Surat Railway News: गुजरातच्या सुरत रेल्वे स्थानकावर शनिवारी चेंगराचेंगरीची घटना घडली. या घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे. तर, अनेकजण जखमी झाले. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिवाळीनिमित्त आपपल्या मूळ गावी जाण्यासाठी प्रवाशांनी सुरत रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी केली. मात्र, त्यावेळी रेल्वेत चढताना चेंगराचेंगरी झाल्याची सांगितले जात आहे.







