
Maharashtra Diamond Trade: गुजरातमध्ये रविवारी (१७ डिसेंबर २०२३) सूरत डायमंड बोर्सचे उद्घाटन करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या सरफा बाजाराचे उद्घाटन झाले. सूरत डायमंड बोर्ससाठी बांधण्यात आलेली इमारत ही जगातील सर्वांत मोठे कार्यालय ठरले आहे. परंतु, मुंबईतील हिरे बाजार गुजरातला हलविण्यात आल्याने व्यापाऱ्यांसह महाराष्ट्राचे महसुलाचे मोठे नुकसान होणार आहे. याशिवाय, नागरिकांना रोजगारालाही मुकावे लागणार आहे.






