Supreme Court : सुप्रीम कोर्टाकडून राहुल नार्वेकरांची खरडपट्टी, सरन्यायाधीश संतापले, म्हणाले…

0
19
Supreme Court : सुप्रीम कोर्टाकडून राहुल नार्वेकरांची खरडपट्टी, सरन्यायाधीश संतापले, म्हणाले…


विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे कारवाई करतील, हा मुद्दाच नाही. ते त्यांनी त्यांच्या कृतीतून दाखवून द्यायला हवं. सुनावणीचं गांभीर्य त्यांना समजायला हवं. आता परत जून महिन्यापासून काय घडलं?, हा गोंधळ होता कामा नये. योग्य प्रकारे सुनावणी व्हायला हवी. नोव्हेंबर नंतर सुनावणी घेवू, असं विधानसभा अध्यक्ष म्हणू शकत नाही. विधानसभा अध्यक्षांनी रोजच्या रोज सुनावणी घ्यावी आणि प्रकरण तडीस न्यावं, असं म्हणत सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना तातडीने सुनावणी घेण्याचे आदेश दिले आहे. येत्या सोमवार पर्यंत वेळापत्रक जाहीर करून सुनावणीला सुरुवात करा, नाही तर आम्ही अपात्रेची सुनावणी घेवू, असा इशारा सुप्रीम कोर्टाने राहुल नार्वेकरांना दिला आहे.



Source link