
मतदान यंत्रावरील नोटा पर्यायाला जर सर्वाधिक मतदान झाले, तर त्या मतदारसंघात नव्याने निवडणुका घेण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला उत्तर दाखल करण्यास नोटीस बजावली आहे.
Supreme Court on Nota : देशात लोकसभा निवडणुकीचा आज (दि. २६ एप्रिल) दुसरा टप्पा सुरू आहे. देशभरातील ८८ मतदारसंघात आज मतदान पार पडत आहे. अशातच देशाच्या सर्वोच्च न्यायालयात एक महत्त्वूपर्ण याचिका दाखल झाली आहे. मतदान यंत्रावर सर्व उमेदवारांच्या यादीखाली ‘नोटा’चा पर्याय दिलेला असतो. वरीलपैकी एकही उमेदवार योग्य वाटला नसल्यास या पर्यायाला मतदान करून मतदार आपली असहमती दर्शवत असतात.
नोटाला जर सर्वाधिक मतदान मिळाले तर….








