Supreme Court : ८९ वर्षीय आजोबांचा घटस्फोटाचा अर्ज सुप्रीम कोर्टानं फेटाळला, कारण काय माहित्येय?

0
14
Supreme Court : ८९ वर्षीय आजोबांचा घटस्फोटाचा अर्ज सुप्रीम कोर्टानं फेटाळला, कारण काय माहित्येय?


‘आमच्यात पुन्हा पती-पत्नीचं नातं फुलू शकत नाही’ केवळ या आधारावर घटस्फोट मंजूर केला जाऊ शकत नाही. घटस्फोट आज निषिद्ध मानला जात नसला तरी भारतीय समाजात विवाहसंस्थेला आजही वेगळं स्थान आहे. विवाहाचं नातं पवित्र मानलं जातं. त्यास धार्मिक, अध्यात्मिक अधिष्ठान आहे व ते एक भावनिक बंधन आहे. अशा परिस्थितीत आम्हाला दुसऱ्या पक्षाचं मतही विचारात घेतलं पाहिजे. अन्यथा परमजीत कौर यांच्यावर अन्याय होईल, असं खंडपीठानं निर्मलसिंग यांचा घटस्फोटाचा अर्ज फेटाळताना स्पष्ट केलं.



Source link