
Happy Birthday Sunny Deol: गेल्या काही महिन्यांपासून अभिनेता सनी देओल बॉलिवूडमध्ये चांगलाच गाजतो आहे. त्याचा ‘गदर २’ हा चित्रपट रिलीज झाल्यापासून अभिनेता चांगलाच फॉर्ममध्ये आला आहे. आज (१९ ऑक्टोबर) सनी देओल आपला वादिवस साजरा करत आहेत. ‘गदर २’नंतर पुन्हा एकदा सनी देओल याचं नाव बॉलिवूडमध्ये चर्चेत आलं आहे. मात्र, ‘गदर २’ रिलीज होण्यापूर्वी सनी देओलचं करिअर जवळपास संपल्यात जमा झालं होतं . मात्र, त्याने पुन्हा एकदा आपला जलवा दाखवला. एक काळ असा होता, जेव्हा सनी देओल बॉलिवूडमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट देत होता. चला तर, अशाच काही चित्रपटांवर नजर टाकूया ज्यांनी सनी देओलच्या कारकिर्दीला हातभार लावला…








