Sunil Kedar : न्यायालयाने शिक्षा ठोठावताच सुनील केदार यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल

0
15
Sunil Kedar : न्यायालयाने शिक्षा ठोठावताच सुनील केदार यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल


Nagpur District co-oprative bank Scam : नागपूर जिल्हा बँकेच्या १५० कोटी रुपयांच्या घोटाळाप्रकरणी काँग्रेसचे नेते, आमदार सुनील केदार यांना ५ वर्षांची शिक्षा कोर्टाने ठोठावली आहे. दरम्यान, काल रात्री त्यांना पोलिसांनी अटक केली असून रात्री दहाच्या सुमारास केदार यांची रवानगी नागपूर कारागृहात करण्यात आली. मात्र, अटक होताच सुनील केदार यांच्या प्रकृतीत अचानक बिघाड झाला. त्यांच्या छातीत आणि डोकेदुखी होत असल्याने त्यांना रात्री उशिरा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आल्याची माहिती आहे. डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेऊन आहेत. 



Source link