
Suniel Shetty On KL Rahul Trolls: सोशल मीडियावर सेलिब्रिटींना ट्रोल करण्याची अनेक प्रकरणं नेहमीच समोर येत असतात. कधीकधी सेलिब्रिटी यावर प्रतिक्रिया देतात, तर कधी ते मुद्दामहून यावर बोलणं टाळतात. केवळ मनोरंजन विश्वच नाही, तर सगळ्याच क्षेत्रातील सेलिब्रिटींना हा अनुभव येतो. क्रिकेटर केएल राहुल याला ट्रोल केल्यानंतर आपल्याला कसं वाटतं यावर अभिनेता सुनील शेट्टी पहिल्यांदाच बोलला आहे. अभिनेता सुनील शेट्टी याने यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. सुनील शेट्टी याची लाडकी लेक अथिया शेट्टी ही क्रिकेटपटू केएल राहुल याच्यासोबत विवाह बंधनात अडकली आहे. तर, सासरेबुवा झालेला अभिनेता सुनील शेट्टी आता आपल्या जावयाला ट्रोल करणाऱ्यांना सुनावताना दिसला आहे.








