
Sunil Grover Sunflower Season 2: ‘गुत्थी’ साकारून सगळ्या प्रेक्षकांना खळखळवून हसवणारा अभिनेता सुनील ग्रोव्हर पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज झाला आहे. सुनील ग्रोव्हर याच्या ‘सनफ्लॉवर’ या वेब सीरिजचा दुसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘सनफ्लॉवर’ या वेब सीरिजचा पहिला सीझन तीन वर्षांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या वेब सीरिजला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला होता. यानंतर आता त्याच्या या सीरिजचा दुसरा सीझन देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या वेब सीरिजमध्ये अभिनेता सुनील ग्रोव्हर याच्यासोबत अनेक गाजलेले कलाकार झळकणार आहेत.








