श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर योनी भगवान महावीर जयंतीनिमित्त सर्व जैन धर्मियांना शुभेच्छा दिल्या

0
35
श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर योनी भगवान महावीर जयंतीनिमित्त सर्व जैन धर्मियांना शुभेच्छा दिल्या

फलटण :श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी भगवान महावीर जयंतीनिमित्त स्टेटस द्वारे सर्व जैन धर्मियांना शुभेच्छा दिल्या आहेत स्टेटस द्वारे शुभेच्छा देताना श्रीमंत रामराजे यांनी
जैन धर्माचे चोवीसावे तीर्थंकर भगवान महावीर यांचा आज २६२३ वा जन्मकल्याणक महोत्सव. भगवान महावीर यांनी सत्य, अहिंसा, संयम आणि करूणेची तत्त्वं समाजात रूजवत मानवी जीवनाला नवी दिशा दिली. सम्यक् दर्शन, सम्यक् ज्ञान, सम्यक् चरित्र ही तीन तत्त्वे देणारे भगवान महावीर यांनी अहिंसेच्या माध्यमातून समाजाला आत्मज्ञानाच्या मार्गावर नेले. प्रेम आणि क्षमाशीलतेची त्यांची शिकवण ही कायमच प्रेरणादायी आहे त्यातुनच सर्व समाजामध्ये शांती व बंधुभावाची भावना वाढीस लागो.भगवान महावीर जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. अशा आशयाच्या सर्व जैन धर्मियांना श्रीमंत रामराजे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत